Deglur News : खानापूर चौरस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

खानापूर चौरस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. दुकानांसमोर मोठ्या पाट्या, साहित्य तसेच रस्त्यावरच उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.
Encroachment Stranglehold at Khanapur Chowk

Encroachment Stranglehold at Khanapur Chowk

sakal

Updated on

देगलूर - देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हा मुखेड, अहमदपूर, लातूर, बोधन, निजामाबाद, नांदेड, अकोला व हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. मात्र वाढत्या अतिक्रमणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांसाठी हा मार्ग डोकेदुखी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com