अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

जयदीप बुधवारी (ता. 18) सकाळी कामावर गेले. त्यावेळी अक्षय खोलीत एकटाच होता. जयदीप रात्री परतल्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने जयदीप यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी अक्षयने छताच्या हुकाला कपड्याच्या साहाय्याने अक्षयने गळफास घेतल्याचे दिसुन आले.

औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी ता. 18 रात्री आठनंतर विद्यानगर भागात उघडकीस आली. काही दिवसांपुर्वी तो परिक्षेसाठी शहरात आला होता. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय सोमनाथ माने (वय 22, रा. ताडसोना, ता. जि. बीड) असे मृताचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात तो सिव्हिल इंजिनियरींगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो काही दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेतील चुलत भाऊ जयदीप यांच्याकडे राहण्यासाठी आला होता.

जयदीप बुधवारी (ता. 18) सकाळी कामावर गेले. त्यावेळी अक्षय खोलीत एकटाच होता. जयदीप रात्री परतल्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने जयदीप यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी अक्षयने छताच्या हुकाला कपड्याच्या साहाय्याने अक्षयने गळफास घेतल्याचे दिसुन आले.

यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पुंडलीकनगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कापसे, एल.व्ही हिंगे, जगदीश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षयला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी त्यालामृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

त्याचे होते सहा विषय बॅक.. 

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, अक्षयचे सहा विषय राहिले होते. परीक्षा देण्यासाठी तो औरंगाबादेतील भावाकडे आला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे ठोस कारण स्पष्ट नसून त्याचे एक भाऊ डॉक्‍टर व दुसरे प्राध्यापक आहेत. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineering student suicide