सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करा

श्‍याम जाधव
मंगळवार, 7 एप्रिल 2020


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरासह देशात आणि राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आपल्या राज्यात आढळले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करतच आहे. परंतु, या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगारांचे काम हातातून निसटले आहेत.

नवीन नांदेड ः कोविड-१९ लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा तत्काळ पुढे ढकलण्याची मागणी स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे ई-मेलद्वारे करण्यात आलेली आहे.

अनेकांना कामे सोडून गावी परतावे लागले 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरासह देशात आणि राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आपल्या राज्यात आढळले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करतच आहे. परंतु, या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगारांचे काम हातातून निसटले आहेत. अनेकांना कामे सोडून गावी परतावे लागले आहे. अनेक कुटुंबे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करीत आहेत. याचा परिणाम विद्यार्थी वर्गावरदेखील तितकाच झालेला आहे. म्हणून एसएफआय नांदेड जिल्हा कमिटीने कुलगुरूंकडे परीक्षेसंदर्भात काही सूचना व मागण्या केल्या आहेत.

शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्याचे नियोजन
विद्यापीठाने तातडीने परीक्षांचे कोणतेही प्रयोगात्मक वेळापत्रक जाहीर करू नये, कारण त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या वसतिगृहात परत येण्यासाठी फक्त ताणतणावच निर्माण होईल, सर्वसामान्य स्थिती निर्माण झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत लक्ष केंद्रित करावे. सर्व अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष या वर्गात शिकत असलेल्यांना, त्यांच्या परीक्षा व निकाल प्रलंबित ठेवून, थेट द्वितीय व त्रुतीय वर्गात प्रवेश घेण्यास मान्यता द्यावी. स्वायत्त महाविद्यालयानांही हे लागू करावे, लॉकडाउन आदेश उठल्यानंतर किमान दोन आठवड्यांनंतर महाविद्यालयात नियमित शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत तीन ते चार आठवड्यांनंतर तासिका सुरू कराव्यात, राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रम विस्कळित झाले असल्याने सर्वत्र पूर्णपणे सर्वसामान्य स्थिती निर्माण झाल्यावरच परीक्षा वेळापत्रकांचे नियोजन करावे.

हेही वाचा -  गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

 

शैक्षणिक वर्षात दिरंगाई होणार नाही
मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या व चौथ्या वर्षाच्या विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करावे. द्वितीय व त्रृतीय वर्षाच्या परीक्षा २२ जूननंतर व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी फक्त या वर्षी महाविद्यालयांनी घ्याव्यात. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात कोणतीही दिरंगाई होणार नाही, अशी मागणी एसएफआयचे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे, विकास वाठोरे, सचिन खडके, मीना आरसे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enroll all students in the next class, nanded news