निमित्त लग्नाचे, बतावणी अंत्यसंस्काराची

file photo
file photo
Updated on

जिंतूर (जि.परभणी) : आमच्या जवळचे नातेवाईक वारले आहेत, त्यांच्या अंत्यसंस्काराला आम्ही जात आहोत, अशी बतावणी करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सहा जणांविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिंतूर शहरातील फतंन कॉलनीमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी औंढा तालुक्यातील गोरेगाव व पुसेगाव येथील काही नागरिक (एमएच ११ - एम ११७५) या वाहनाने १५ एप्रिल रोजी सकाळी ४:४५ ला जिंतूरला पोचले. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पेट्रोलिंग करणारे सहायक पोलिस निरीक्षक अभय दंडवत यांनी संबंधितांची चौकशी केली असता जिंतूर शहरातील आमचे नातेवाईक नामे समंदर ऊर्फ कलंदर ऊर्फ करीम याचे निधन झाले असून आम्ही अंत्यसंस्कारासाठी जात आहोत, अशी खोटी बतावणी केली. 

चौकशीत खरा प्रकार समोर
पोलिसांनी संबंधितांना पोलिस स्थानकात आणून चौकशी केली असता संबंधित व्यक्ती जिंतूर येथील फतन कॉलनीतील एका विवाह सोहळ्यासाठी गोळेगाव येथून आले होते. पोलिसांनी जीप चालक नागोराव हरिभाऊ गुंजावळे, शेख नजीर शेख अहमद, आसेफबी शेख नजीर, निलोफर भ्र शेख मुनीर, शेख मेहमुदाबी भ्र मजिद, शेख मुनीर शेख कलीम हे तोंडाला मास्क न लावता पोलिसांना खोटी माहिती देऊन आपत्कालीन परिस्थिती असताना हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश करताना आढळून आल्याने त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदरील वाहन जप्त केले आहे.

सामूहिक नमाज अदा करणाऱ्यांवर गुन्हे
जिंतूर (जि.परभणी) :
जमाव बंदी आदेश असतानाही एका शेतामध्ये सामूहिकरीत्या जमून नमाज अदा केल्याबद्दल त्यांच्यावर जिंतूर पोलिसात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता.१३) दुपारी एकच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेबाबतचा गुन्हा मंगळवारी (ता.१४) उशिराने दाखल झाला. येलदरी रोडवरील एका शेतात  तोंडाला मास्क न बांधता व शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन सामूहिक नमाज अदा करण्यात येत होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com