सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

file photo
file photo
Updated on

परभणी : प्रशासनाने दिलेले आदेश झुगारून पाथरी रोडवरील मार्केट यार्डामध्ये बुधवारी (ता. १५) बहुतांश भाजीपाला, फळांच्या ठोक विक्रेत्यांनी आपले व्यवहार आहे त्या जागेवरच सुरू ठेवल्याचे व खरेदीसाठी येथे काही शेतकरी , किरकोळ विक्रेत्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र होते. परिसरातील शेतकऱ्यांसह काही ठोक विक्रेत्यांनी मात्र, आपले व्यवहार नियोजित जागेवर केले.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी १३ एप्रिल रोजी ४१ फळे, भाजीपाला विक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून पाथरी रोड मार्केट यार्डासमोर असलेल्या खुल्या मैदानावर आपल्या साहित्याची विक्री करण्याचे आदेश बजावले होते. परंतु, बुधवारी या ठिकाणचे चित्र मात्र वेगळे होते. खेड्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी या खुल्या मैदानावर आपली दुकाने थाटली होती, तर बोटावर मोजक्या मोजण्याइतके काही घाऊक विक्रेतेदेखील येथे व्यवहार करीत होते. बहुतांश ठोक विक्रेते व बडे शेतकरी यार्डाच्या बाहेर आलेच नाहीत. त्यांनी यार्डात राहूनच आपापल्या दुकानासमोर व्यवहार पूर्ण केले. तेथूनच किरकोळ विक्रेत्यांना भाजी व फळांची विक्री केल्याचे चित्र होते. या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते यांची मोठी गर्दी होती सोशल डिस्टन्सिंगचा कुठेच लवलेश नव्हता.
हेही वाचा व पहा - Video: भुकेल्यांसाठी शिवभोजनाची थाळी ठरतेय तारक


नियम न पाळल्यास धोका वाढणार
परभणी शहरासह जिल्ह्याला अध्यापन कोरोनाची बाधा झालेली नाही, हेच सुदैव. कारण शहरात जिल्ह्यात असे अनेक गट-तट दिसून येत असून ते प्रशासकीय आदेशाची पायमल्ली करीत असतानाचे चित्र आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा पालन करण्याऐवजी त्याला केराची टोपली दाखविण्याचे कामे करीत आहेत. राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक जिल्हे, शहरे त्रस्त आहेत. येथेदेखील अशीच परिस्थिती राहिली तर कोरोना फैलावण्याची धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातदेखील अनेक दुकाने सुरू
जिल्हा प्रशासनाने मेडिकल स्टोअर्ससह किराणा दुकाने व काही अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, चार-पाच दिवसांपासून शहरात अनेक ठिकाणी चहाटपऱ्या, उपाहारगृह, चप्पलांची दुकाने, कटलरी, महिला साहित्याचे स्टोअर्स, कपड्यांची दुकाने सकाळी सात ते अकराच्या दरम्यान उघडली जात असून त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com