esakal | गरजूंच्या मदतीला धावले उद्योजक
sakal

बोलून बातमी शोधा

NND06KJP02.jpg

दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची पावडर व मसाला पावडर असे एक हजार कुंटूबाला देण्यासाठी एक हजार किट जिल्हा प्रशासनास दिले आहे.

गरजूंच्या मदतीला धावले उद्योजक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : देणाऱ्याचे हात हजार या वाक्याला सार्थ ठरवत अडचणीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. नांदेडमधील प्रसिध्द उद्योजक प्रदीप चाडावार यांनी गरजू, बेघर, रेशनकार्ड नसणाऱ्या एक हजार कुटुंबाना अन्नधान्याचे मदत किट पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे.

हातावर पोट असणाऱ्यांना धान्य वाटप
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासन प्रशासन दिवस रात्र मेहणत घेत आहे. अशावेळी लॉकडाऊन घोषीत केल्यामुळे अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. या काळात हातावर पोट असलेल्यांना तयार जेवणाएवजी एक महिना पूरेल एवढे अन्नधान्याचे किट देण्याचे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले होते. या कामात अनेकांनी सहभाग घेवून संकटकाळी धावून येण्याचे काम केले आहे.

हेही वाचा....बेरोजगार संस्था सभासदांना न्याय कधी ?

एक महिना पुरेल एवढ्या धान्याचे किट
बेघर गरजू, गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची पावडर व मसाला पावडर असे एक हजार कुंटूबाला देण्यासाठी एक हजार किट जिल्हा प्रशासनास दिले आहे. उद्योजक आणि व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी सोमवारी (ता. सहा) जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे किट सुपूर्त केले. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन उपस्थित होते.

हेही वाचलेच पाहिजे....संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य

सामाजिक कार्यात नेहणीचे अग्रेसर 
प्रदीप चाडावर हे मूळचे किनवटचे आहेत. सध्या ते नांदेड येथे वास्तव्यास आहेत. लायन्स क्लब नांदेडचेंही ते सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे चांगले योगदान राहिले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी एक हजार किट जिल्हा प्रशासनास वाटपासाठी सुपूर्द केले. ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा गरजुना याचे वाटप करण्यात येणार आहेत. देणाऱ्याचे हात हजार, तसे हजार व्यक्तीला ही मदत पोहोचणार म्हणून हे वाक्य आज सार्थ ठरले आहे. नांदेडकरांनी नांदेडकरसाठी केलेली मदत आणि प्रशासन व पालकमंत्री यांच्या समन्वयातून कोरोनाच्या संकटामधून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास वाटतो.