अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरालगत असलेल्या जंगी तलाव (पाच पिंपळ) यामध्ये बेमोसमी पावसामुळे तलाव तुडुंब भरला आहे. या जंगी तलावात टाकलेल्या मत्स्यबीजामुळे मत्स्यव्यवसाय चांगलाच जोमात आला. पाण्यामुळे माशांची पैदास चांगलीच झाली होती.