‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी नीतिमत्ता महत्त्वाची’ 

sakal news
sakal news

लातूर : कुठल्याही उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर सचोटीने आणि नितिमत्ता जपून काम केले पाहिजे. व्यावसायिक मूल्य जपली पाहिजेत. यशस्वी होण्याचा हाच गुरुमंत्र असल्याचे मत नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीच्या सहायक प्रांतपाल माया कुलकर्णी या होत्या.

यावेळी कोविड काळातील सेवा कार्याबद्दल डॉ. विजय चिंचोळकर, बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योजक जगदीश कुलकर्णी, व्यापार क्षेत्रातील मेसर्स वर्मा झेरॉक्सचे किशोर वर्मा व मुकेश वर्मा, महिला उद्योजक सुचिपर्ण नर्सरीच्या संचालक मंगल बोधे, सेवा क्षेत्रातून दामोदर मुंदडा व लघु उद्योजक अमोल ठाकूर यांना गौरविण्यात आले.  याप्रसंगी ठोंबरे यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठीचे सूत्र अनेक उदाहरणांसह उपस्थितांना सांगितले. 2007 या वर्षी हाच पुरस्कार मला रोटरी मिडटाऊन तर्फे देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

डॉ. माया कुलकर्णी यांनी रोटरी इंटरनॅशनल कशी सुरु झाली, या संघटनेचे उद्देश काय आहेत हे सांगितले. प्रेरणादायी गोष्टींच्या माध्यमातून रोटरी जगभर कशा प्रकारे काम करते याची माहिती त्यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र बनकर, व्होकेशनल डायरेक्टर संतोष हत्ते, प्रोजेक्ट चेअरमन चंद्रप्रभू जंगमे, दिनेश सोनी, स्वप्नील राजेमाने, सतीश कडेल, सारंग अयाचित, उमा व्यास, रवी जोशी, जगदीश कुलकर्णी, उमाकांत मद्रेवार, विरेंद्र फुंदिपल्ले, अनिकेत येरते, जयेश पेद्दे आदींनी पुढाकार घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com