
जगात जर्मनी व भारतात परभणी ही म्हण सातत्याने परभणीसाठी उपरोधात्मक म्हणून वापरली जाते. परंतू, अनेक काही गोष्टी अश्या आहेत की ज्यामुळे परभणी सातत्याने राज्यात चर्चेत असते. सध्या तर परभणीचे नाव देशात गाजत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सध्या पेट्रोल व डिझेलच्या दराने परभणी चर्चेत आली आहे.
परभणी ः जगात जर्मनी व भारतात परभणी ही म्हण सातत्याने परभणीसाठी उपरोधात्मक म्हणून वापरली जाते. परंतू, अनेक काही गोष्टी अश्या आहेत की ज्यामुळे परभणी सातत्याने राज्यात चर्चेत असते. सध्या तर परभणीचे नाव देशात गाजत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सध्या पेट्रोल व डिझेलच्या दराने परभणी चर्चेत आली आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ९३.६९ रुपये प्रतीलिटर पेट्रोल व ८३.१४ रुपये प्रतिलिटर डिझेलची विक्री होत आहे.
सर्वसामान्यांच कंबरडं मोडले
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच कंबरडं मोडले आहे. राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत असून पेट्रोल प्रति लिटर ९३.६९ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्याचे सांगितले जात आहे. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २५ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैश्यानी वाढ केली आहे. त्याचा परिणाम आता दिसून आला आहे.
जिल्ह्यात १०० ते १२५ पेट्रोलपंप
राज्यात परभणी शहरात सर्वाधिक दर आकारले जात आहेत. याच्या कारणांचा शोध घेतला असता परभणी जिल्ह्यात तीन महत्वाच्या कंपन्याचे १०० ते १२५ पेट्रोलपंप आहेत. या पंपावरून पेट्रोल व डिझेलचे वितरण केले जाते. यात इंडियन ऑईल, हिंदूस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यासह रिलायंन्स, ऐस्सार या कंपन्यांचेही पेट्रोलपंप या जिल्ह्यात कार्यकत आहेत.
हेही वाचा - गावाचा विकास करतील अशा लोकांच्या हातात जनतेनी सत्ता द्यावी असं आवाहनही खा. निंबाळकर यांनी यावेळी केले आहे
पेट्रोलचे भाव परभणीतच का वाढतात ?
परभणी जिल्ह्यातील पेट्रोलपंपाना सोलापूर व मनमाड येथून पेट्रोलचा पुरवठा होतो. हिंदूस्तान पेट्रोलियमसाठी सोलापूर तर इंडियन पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमसाठी मनमाड येथून पेट्रोल व डिझेल पुरविले जाते. परभणी शहरापासून ही दोन्ही शहरे दुर असल्याने त्यांच्या वाहतुकीवर जादा खर्च होत असल्याने परभणीत पेट्रोल पोहचेपर्यंत त्यांचे दर नाईलाजाने वाढवावे लागतात असे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.
संपादन ः राजन मंगरुळकर