Rajesh Tope : टोपेंच्या अर्जानंतर होणार ईव्हीएमची तपासणी
EVM Machine : जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर शंका व्यक्त करत घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी ईव्हीएम तपासणीची मागणी केली आहे. यासाठी पाच केंद्रांतील ईव्हीएमची तपासणी होणार आहे.
जालना : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ईव्हीएम मशीनवर उमेदवारांसह अनेकांकडून शंका घेतली जात आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठी उमेदवारांकडून मागणी केल्यास ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनची उलट तपासणी केली जाते.