
परभणी शहर वाहतुक शाखेचे कोरोना काळापासून शहरात उत्कृष्ट काम सुरु आहे. वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर व फौजदार चंद्रचुड हत्तेकर यांच्यासह पथकाने शहरातील वाहतुकीला शिस्त लावली आहे.
परभणी ः शहरातील वाहतुक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलिसांचे योगदान मोठे असते. या वर्षभरात वाहतुक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांची कडक अमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे. सरत्या वर्षाच्या 12 महिण्यात वाहतुक शाखेच्यावतीने वाहतुक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत तब्बल 54 लाख 51 हजार 950 रुपयांचा दंड वसुल केला आहे.
परभणी शहर वाहतुक शाखेचे कोरोना काळापासून शहरात उत्कृष्ट काम सुरु आहे. वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर व फौजदार चंद्रचुड हत्तेकर यांच्यासह पथकाने शहरातील वाहतुकीला शिस्त लावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता शहरात बेशिस्त वाहनावर कारवाई केली जात आहे. शहर वाहतुक शाखेच्यावतीने मोटार वाहन कायद्याखाली जानेवारी ते डिसेंबर 2020 या 12 महिण्याच्या कालावधीत मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतुक असो की नियमांचे पालन न करणारे वाहनधारक असो. त्यांच्यावर चांगले नियंत्रण बसले आहे.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात सोमवारपासून पोलिस दलाचे वार्षिक नियोजन, पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती
मोटार वाहन कायद्याखाली 53 लाखाचा दंड
परभणी शहरात मोटार वाहन कायद्याखाली वाहतुक शाखेने तब्बल 20 हजार 779 केसेस केल्या आहेत. त्यातून तब्बल 54 लाख 24 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात जानेवारी मध्ये 2 हजार 245 केसेस करून 5 लाख 36 हजार 400, फेब्रुवारी मध्ये 1 हजार 719 केसेस करून 4 लाख 14 हजार 200, मार्च मध्ये 1 हजार 436 केसेस करून 4 लाख 42 हजार 600, एप्रिल मध्ये 26 केसेस करून 8 हजार, मे महिण्यात 842 केसेस करून 2 लाख 75 हजार, जुन महिण्यात 1 हजार 490 केसेस करून 3 लाख 67 हजार 700, जुलै महिण्यात 5 हजार 432 केसेस करून 12 लाख 87 हजार 400, ऑगस्ट महिण्यात 2 हजार 523 केसेस करून 6 लाख 89 हजार 400, सप्टेंबर महिण्यात 917 केसेस करून 3 लाख 69 हजार 400, ऑक्टोबर महिण्यात 879 केसेस करून 2 लाख 22 हजार 600, नोव्हेंबर महिण्यात 1 हजार 604 केसेस करून 3 लाख 83 हजार 450, डिसेंबर महिण्यात 1 हजार 666 केसेस करून 3 लाख 96 हजार 200 असा दंड वसूल केला आहे.
अवैध प्रवासी वाहतुक प्रकरणी 1 लाख 27 हजार दंड
अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या 276 वाहनावर कारवाई करत त्यांच्याकडून जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात जानेवारी महिण्यात 44 केसेस करून 43 हजार, फेब्रुवारी मध्ये 26 केसेस करून 32 हजार 600, मार्च मध्ये 21 केसेस करून 8 हजार 600, सप्टेंबर महिण्यात 1 केसेस करण्यात आली. ऑक्टोबर महिण्यात 11 केसेस करून 3 हजार 500, नोव्हेंबर महिण्यात 64 केसेस करून 39 हजार 500, डिसेंबर महिण्यात 109 केसेस करण्यात आल्या आहेत.
येथे क्लिक करा - हिंगोली : मागील वर्षात साडेचार हजार रक्तदात्यांनी केले रक्तदान
लॉकडाऊनमुळे एप्रिल ते ऑगस्ट केसेस नाही
एप्रिल ते ऑगस्ट महिण्यात प्रवाशी वाहतुक बंद होती. त्यामुळे या काळात अवैध प्रवाशी वाहतुकीची एकही कारवाई करण्यात आलेली नाही. "शहरातील वाहनधारकांनी वाहतुक नियमांचे पालन केले पाहिजे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनधारकांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनाची कागदपत्रे विशेष करून वाहन चालविण्याचा परवाना जवळ बाळगने आवश्यक आहे."
- डॉ. नितीन काशीकर, सहायक पोलिस निरीक्षक, परभणी
संपादन- प्रल्हाद कांबळे