
पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण, औंढा नागनाथ, बाळापूर आखाडा, सेनगांव व गोरेगांव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उप विभाग वसमत व हिंगोली ग्रामीण या कार्यालयाला भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी करणार आहेत.
हिंगोली : जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलाचे वार्षिक नियोजन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या उपस्थितीत सोमवारपासून ( ता. चार ) वार्षीक निरीक्षण सुरु होणार आहे.
पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण, औंढा नागनाथ, बाळापूर आखाडा, सेनगांव व गोरेगांव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उप विभाग वसमत व हिंगोली ग्रामीण या कार्यालयाला भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी करणार आहेत. पोलिस ठाण्याशिवाय वेळेवर कोणत्याही पोलिस ठाण्याला भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत १४१ अर्ज अवैध, १० हजार ४३ उमेदवार रिंगणात
या वार्षीक निरीक्षणाचे अनुषगांने जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यामध्ये साफसफाई, रंगरंगोटी सुरु असून रेकॉर्ड अद्यावत करणे तसेच प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा जलद गतीने सुरु आहे. वार्षीक निरीक्षणादरम्यान हिंगोली शहरात नव्याने स्थापन होणाऱ्या पेन्शनपुरा पोलिस चौकी व रिसाला बाजार पोलिस चौकीचे उद्घाटन पोलिस उप महानिरीक्षक श्री. तांबोळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील पिडीत महिला व बालकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता एकाच छताखाली विविध सोयींची उपलब्धता करुन पिडीत महिला व बालकांना मानसीक आधार देवून योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलिस अधिक्षक कार्यालयातील प्रांगणामध्ये भरोसा सेलची स्थापना करण्यात येणार असून त्याचे उदघाटन देखील वार्षीक निरीक्षणा दरम्यान करण्यात येणार आहे. पिडीत महिलांना आपण माहेरी आलो असून आपल्या माहेरवासीयांसोबतच आपण बोलत आहोत असे वातावरण निर्मीती भरोसा सेलमध्ये करणे सुरु असून भरोसा सेलमधील अधिकारी व कर्मचारी यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे