छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात मॉन्सूनपूर्व धुवाधार, जूनच्या सुरवातीला मध्यम स्वरूपाचा आणि त्यानंतर मान्सूच्या आगमानाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाड्यात बुधवारी (ता. २५) दुपारनंतर पावसाचे काही भागांत आगमन झाले. .पंधरा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या पावसाने पेरणी झालेल्या क्षेत्राला दिलासा मिळाला आणि उर्वरित पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या. नांदेड जिल्ह्यात मुसळधार तर जालना, हिंगोलीत संततधार पाहायला मिळाली..छत्रपती संभाजीनगरात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या २४ तासांत ३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या काही भागांत आज पाऊस झाला. अन्य जिल्ह्यांत पाऊस हजेरीपुरता होता..नांदेड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांनी माना टाकल्या होत्या. परंतु, काल रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सरासरी ६०.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गत २४ तासांत किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, बिलोली, लोहा, भोकर, मुदखेड, अर्धापूर, नायगाव या ११ तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला. ३९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे..यातील आठ मंडळांत १०० ते १५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे दिसून येते. तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस असा ः नांदेड ७५, बिलोली ७०, मुखेड २४, कंधार ३४, लोहा ४२, हदगाव ७६, भोकर ५४, देगलूर ३७, किनवट १०४, मुदखेड १०१, माहूर १२२, धर्माबाद २५, उमरी ५८, अर्धापूर ५९, नायगाव ३९. दरम्यान, विष्णुपुरी धरणातील पाणीसाठ्यात साडेतीन टक्क्यांची, तर मानार प्रकल्पात सुमारे १० टक्के पाणीसाठा वाढला आहे..हिंगोलीत संततधारहिंगोली जिल्ह्यात बारा दिवसांच्या उघडिपीनंतर बुधवारी रात्री सातला सुरू झालेल्या पावसाची गुरुवारी दिवसभर संततधार सुरू होती. सकाळी आठला संपलेल्या गेल्या २४ तासांत सरासरी ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..जालन्यात रिपरिपजालना शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या २४ तासांत सरासरी २२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भोकरदन तालुक्यातील धावडा (६६.३ मिमी), अन्वा (६५.३) जाफराबाद तालुक्यातील वरूड (७६.५) या मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली..Marathi Poetry : अक्षर सुलेखनातून साकारला ‘मनकवडसा’; आगळावेगळा कवितासंग्रह; कवयित्री आरती झोटिंग यांनी जपले वेगळेपण .रेणुकादेवी मंदिराची संरक्षक भिंत कोसळलीमाहूर : माहूर गडावरील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिराच्या संरक्षक भिंतीत पाणी शिरल्याने गुरुवारी (ता.२६) सकाळी भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ‘लिफ्ट स्कायवॉक’च्या कंत्राटदाराने मंदिर परिसरातील संरक्षण भिंत व इमारती खालचा भाग पोखरल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी पुरातत्त्व विभागासह मंदिर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडल्याची चर्चा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.