Parbhani : 'ड्रग इन्सपेक्टर पदासाठी अनुभवाची अट शिथील करावी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC
ड्रग इन्सपेक्टर पदासाठी अनुभवाची अट शिथील करावी

'ड्रग इन्सपेक्टर पदासाठी अनुभवाची अट शिथील करावी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : राज्य सरकारने ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८७ जगाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु, त्यामध्ये तीन वर्ष अनुभवाची अट टाकलेली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, सिक्कीम इत्यादी राज्यांनी ही अट शिथिल केली आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने ही अनुभवाची अट शिथील करावी, अशी मागणी फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली. संघ लोकसेवा आयोग यांनी सुद्धा पदाची अनुभव अट काढून टाकली.

आतापर्यंत लखनऊ, दिल्ली हायकोर्टानेसुद्धा याबाबत अनेक निकाल देऊन अनुभवाची गरजेचा नाही, असे म्हटले आहे. नुकतेच पदवी फार्मसी झालेले बेरोजगार फार्मसिस्ट यांची संख्या १.५ लाखांपेक्षा जास्त आहे. विद्यार्थी रोजगाराच्या शोधत असतात मग तीन वर्ष अनुभव घेतलेले आर्थिक सक्षम लोकांना घेऊन काय साध्य होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नियुक्तीसाठी अनुभवाची अट न ठेवता नियुक्तीनंतर प्रोबेशन आणि ट्रेनिंग ठेवले तरी सुद्धा त्या पदाला न्याय देणे शक्य होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

सरसकट सर्व पदवी फार्मसी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी व आपल्या सेवा प्रवेश नियमामध्ये तातडीने बदल करावे, अशी मागणी केली आहे. असे न केल्यास फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेला स्थगिती द्यावी आणि नव्याने जाहिरात द्यावी, असे न झाल्यास राज्यभर फार्मासिस्ट संघटना आंदोलन उभे करणार असून ता. ३० नोव्हेंबर पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास फार्मसी विद्यार्थी बचाव कृती समितीसमोर आमरण उपोषण हाच मार्ग असेल, याची शासनाने नोंद घ्यावी, असा इशाराही या समितीने दिला आहे.

loading image
go to top