Explosion Firecracker Factory : गोजवाडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; परिसरात खळबळ, कोणतीही जीवितहानी नाही

गोजवाडा शिवारातील एका फटाका कारखान्यात अचानक स्फोट होऊन परिसरात खळबळ उडाली.
Explosion at a firecracker factory Gojwada

Explosion at a firecracker factory Gojwada

sakal

Updated on

वाशी - गोजवाडा, ता. वाशी शिवारातील एका फटाका कारखान्यात शुक्रवार (ता. सहा) सकाळी साडे आठच्या सुमारास अचानक स्फोट होऊन परिसरात खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने कारखान्याचे पत्र्याचे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com