CM Devendra Fadnavis
sakal
लातूर - समृद्धी महामार्गला अनेकांनी विरोध केला होता. पण, आता या महामार्गावर औद्योगिक क्लस्टर उभे राहिले आहे. उद्योगांची रांग लागली आहे. जागा नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे दहा हजार हेक्टर जागा घेतली आहे.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा असाच विकास व्हावा म्हणून ‘लातूर-मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस वे’ तयार केला जाणार आहे. तो येथील औद्योगिक प्रगतीचा महामार्ग बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.