Dharashiv Crimesakal
मराठवाडा
Dharashiv Crime: पवनचक्की कामगारांना खंडणीसाठी मारहाण; धाराशिव जिल्ह्यातील घटना, चार जण गंभीर
Extortion Threat: लोहारा (धाराशिव) येथील पवनचक्की प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना "पैसे द्या नाहीतर काम करू देणार नाही" अशा धमकीनंतर मारहाण झाली.
लोहारा (जि. धाराशिव) : ‘आमच्या भागात काम करायचे असेल तर पैसे द्या’ अशी खंडणीसाठी धमकी देत संशयित अजित मुसांडे, शंकर मुसांडे, सूरज साळुंके, नरहरी बाबर (सर्व रा. धानुरी), विशाल कर्ण जमादार (रा. लोहारा खुर्द) यांनी बुधवारी (ता. ३०) पवनचक्की प्रकल्पातील कामगारांना टोळक्याने बेदम मारहाण केली.