Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

Fake QR Codes Used to Cheat 71 Year Old Woman in Parli: परळीतील ७१ वर्षीय निवृत्त मुख्याध्यापिकेची ८ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक
Online Saree Shopping Fraud in Maharashtra Woman Loses 864 Lakh After Facebook Ad and Cyber Police Hold Nearly 2 Lakh

Online Saree Shopping Fraud in Maharashtra Woman Loses 864 Lakh After Facebook Ad and Cyber Police Hold Nearly 2 Lakh

esakal

Updated on: 

बीड: सोशल मीडियावरील मोहजाळ आणि ऑनलाईन खरेदीचा बडगा आता ज्येष्ठ नागरिकांच्याही जीवावर बेतू लागला आहे. फेसबुकवरील एका साड्यांच्या जाहिरातीवरून ऑर्डर देणे एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगांनी वेगवेगळ्या बहाण्याने विश्वास संपादन करत तब्बल ८ लाख ६४ हजार ९२४ रुपयांची घसघशीत रक्कम उकळल्याचा संतापजनक प्रकार परळी शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...