esakal | कारखानदारांनो कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई- डॉ. विपिन
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

कामगार इतर ठिकाणीं स्थलांतरीत होत असतील तर अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे.

कारखानदारांनो कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई- डॉ. विपिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाजगी उद्योगधंदे व कारखाने इत्यादी मधील कामगार इतर ठिकाणीं स्थलांतरीत होत असतील तर अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून काही उद्योगधंदे व कारखान्यातील कामगार हे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरीत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित कामगारांना सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या कारखाने व उद्योगधंदा व्यवस्थापन यांची आहे. या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी व सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी करण्यात यावी गरज पडल्यास या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारी राहील. असे स्पष्ट करून डॉ. विपीन यांनी याप्रकरणी हलगर्जी झाल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

कंत्राटदार यांनी परराज्यातील व इतर कामगारांची व्यवस्था करावी.

राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे जेथे काम चालू आहे तेथील संबंधित कंत्राटदार यांनी परराज्यातील व इतर कामगारांची व्यवस्था करावी. याबाबत काही तक्रारी किंवा अडचणी आल्यास तसेच अधिक माहितीसाठी श्री भिंगारे (प्रादेशिक अधिकारी महाऔद्योगिक विकास महामंडळ, नांदेड) यांच्या चलभाष क्रमांक 9975597711 यांचेकडे व श्री सय्यद मोहसीन सहाय्यक (कामगार आयुक्त, नांदेड) यांचा चलभाष क्रमांक 7276216066 वर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचासाठेबाजी, नफाखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा...

मालवाहतूक करणाऱ्या

वाहनांवरील पथकर वसुलीस स्थगिती

नांदेड : कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील पथकर स्थानकावर मालवाहतुक करणाऱ्या वाहनांवरील पथकर वसुलीस ता. २९ मार्च मध्यरात्रीपासून राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे स्थगिती दिली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील नांदेड- नर्सी रस्त्यावरील बरबडाफाटा (साखळी क्रमांक २८७ / ४०० व खानापुर फाटा (साखळी क्रमांक ३३१ / ४००) व शिरुरताजबंद -मुखेड- नरसी रस्त्यावरील हाडोळती (साखळी क्र. १०), खरब खंडगाव (साखळी क्रमांक ५०) व विजयनगर (साखळी क्रमांक ९०) या पथकर स्थानकावरील माल वाहतुक करणाऱ्या (Goods Transport) वाहनांवरील पथकर वसुलीस शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी दिली आहे.