
देगलूर - दुचाकीवर पतीसोबत तुपशेळगावकडे जाणाऱ्या दांपत्याला 'आम्ही पोलीस आहोत परवाच येथे खुनाची घटना घडली आहे' असे म्हणून चार भामट्यांनी मुखेड तालुक्यातील लक्ष्मीबाई पिंपरे यांच्या चार तोळे सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या. ही घटना ता.२३ जुलै रोजी वन्नाळी टोल नाक्याजवळ दुपारी घडली.