Deglur News : दावणगीरमध्ये बनावट कागदपत्र प्रकरणी सरपंच, ग्रामसेवकासह चार जणांवर गुन्हा दाखल
Fake Documents Case : पुण्याहून दावणगीर येथे बार स्थलांतर करण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करून ग्रामपंचायतीकडे सादर केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व दोन व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
देगलूर : धनकवडी पुणे येथून एक बार तालुक्यातील मौजे दावणगीर येथे स्थलांतर करण्याच्या प्रकरणात खोटे दस्तऐवज तयार केल्या प्रकरणी विद्यमान सरपंच, ग्रामसेवकासह इतर दोन व्यवसायिकाविरोधात मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.