
मानोरा : राजस्थानहून कमी दरात आणलेले रासायनिक खत, स्थानिक पातळीवर नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरून बनावट खताची निर्मिती करून विक्री करणाऱ्या दिनेश गजानन चव्हाण याच्यावर कृषी विभागाच्या तक्रारी नंतर ३ जून रोजी मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १५ दिवस झाले मात्र, आरोपी अद्याप मोकाट असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.