Fake Marriage Racket in Dharashiv: खोटा विवाह लावून देत तरुणाचे सव्वा लाख लाटले; नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
Dharashiv Fraud: धाराशिव येथे मध्यस्थामार्फत जमविलेल्या लग्नात तरुणाची सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाली. बनावट विवाह करून नवरीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव : मध्यस्थामार्फत नवरी शोधून लग्न करण्याचा प्रकार वडगाव (सि.) येथील तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. लग्न जमवून खोटा विवाह करीत सातारा जिल्ह्यातील नवरीसह पाच जणांनी त्याला सव्वा लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.