तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी मंदिरात आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शनबंदीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला..मंदिर प्रशासनाकडून यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींना पास देण्यात येत होते. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या आप्तेष्टांना दररोज पास देण्यात येत असल्याची नागरिकांत चर्चा होती. यासंदर्भात तुळजापुरातील काही राजकीय नेत्यांनी तुळजाभवानी मंदिर समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत..नुक्कड नाटक लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या नाट्यकलेचा 'इतिहास'.त्यानुसार प्रशासनाने आता बोगस व्हीआयपींना पास न देण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रांगेत उभे राहून इतर भक्तांप्रमाणे ते दर्शन घेऊ शकतात. तर आमदार, माजी आमदार तसेच राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मंदिर समितीकडून पास कायम दिले जाणार आहेत..सशुल्क पास दर्शन सुरूचदेशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यरत असणारे मान्यवर तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणे आवश्यक बाब आहे. काही मंडळी व्यवसायाच्या दृष्टीने त्यांचे लोक व्हीआयपी आहेत असे भासवतात. त्यामुळे खऱ्या व्हीआयपींनाही आता त्यांचे कसब लावावे लागणार आहे. .दरम्यान, दोनशे आणि पाचशे रुपयांचे सशुल्क पास दर्शन सुरूच राहणार आहे. व्हीआयपी पास व्यतिरिक्त तुळजाभवानी मंदिरात महत्त्वाच्या लोकांना सशुल्क पास दर्शन सेवा उपलब्ध आहे. या पासद्वारे अनेक जण दर्शन घेऊ शकतात. दरम्यान, मंदिरात सर्वच राजकीय पक्षांचे नेते दर्शनासाठी येतात. तथापि, विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असाही सूर उमटत आहे..नैनीताल ते केदारनाथ उत्तराखंडमधली ही ८ स्वर्गसमान ठिकाणं.तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी दोनशे तसेच पाचशे रुपयांचे सशुल्क दर्शन पास उपलब्ध आहे. आमदार, माजी आमदार तसेच राज्य सरकारमधील विविध क्षेत्रामधील अधिकारी यांना मंदिर समितीने व्हीआयपी दर्जाची सोय ठेवली आहे. तथापि, कोणीही व्हीआयपी आहे असे सांगणाऱ्यांना आता व्हीआयपी दर्शनाची संधी मिळणार नाही.-अरविंद बोळंगे, सरव्यवस्थापक तथा तहसीलदार, तुळजाभवानी मंदिर समिती तुळजापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.