Beed News : मुलांना वाचवताना उखंडा तलावात बुडून कुटुंबप्रमुखाचा दुर्दैवी अंत

पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील मुलांना पाण्यातून वाचवताना कुटुंबप्रमुखाचाच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
ukhanda lake

ukhanda lake

sakal

Updated on

​बीड - पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील मुलांना पाण्यातून वाचवताना कुटुंबप्रमुखाचाच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील उखंडा तलाव येथे घडली. राजेश वामन निर्मळ (वय-४५, रा. बीड, मूळ रा. लिंबागणेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुदैवाने, तिन्ही मुलांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com