कुटुंबीयांनी धरला दुसर्‍या लग्नाचा आग्रह अन् त्याने घेतली उडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

दुसरे लग्न करण्याच्या कुटुंबाच्या आग्रहाला वैतागल्याने पस्तीस वर्षीय तरुणाने पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली.

औरंगाबाद - दुसरे लग्न करण्याच्या कुटुंबाच्या आग्रहाला वैतागल्याने पस्तीस वर्षीय तरुणाने पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. जखमी झाल्याने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुसा शेख मुश्ताक (वय 35,  रा. जिन्सी परिसर) असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह झालेला आहे. परंतु त्याला दुसरे लग्न करावे असा कुटुंबाचा आग्रह होता. परंतु त्याची इच्छा नसल्याने तो लग्नासाठी नकार देत होता. यातून तो मंगळवारी सकाळी साडेदहाला पोलिस आयुक्त कार्यालयात आला. तेथील पायऱ्यावर अर्धा तास बसल्यानंतर तो पहिल्या मजल्यावर आला. सायबर शाखेच्या दिशेने असलेल्या गॅलरीजवळून त्याने उडी घेतली. यात तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family insisted on another marriage