पाचोड - रक्ताच्या नात्यात असलेल्या चुलत पुतण्यांनीच चोरटे आल्याचा बनाव करत विहीरीकडे नेऊन जमिनीच्या वादातून पासष्ट वर्षीय चुलत्याचा कोयत्याने धडावेगळे मुंडके छाटून खून करून मृतदेह विहीरीत फेकल्याप्रकरणी चिंचाळा (ता. पैठण) येथील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ दिवसानंतर मोठ्या शिताफीने जेरबंद केल्याची घटना शनिवारी (ता. १७) घडली. यांतील कृत्य 'क्राईम पेट्रो' मालीका पाहुनच सुचल्याचे आरोपीने सांगितले. अटक करण्यात आलेल्या या दोघांना पैठणच्या न्यायलयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.