
agriculture loss compensation
परभणी - जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.