esakal | बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक । SBI
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Apprentice Recruitment

बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (जि. परभणी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत पीक कर्ज कमी मंजूर केल्याच्या रागात एका शेतकर्‍याने विषारी औषध प्रशासन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सेलूत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी ( ता.०१ ) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्ररकणी सेलू पोलीस ठाण्यात संबंधित शेतकर्‍या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: मांजराचे दरवाजे बंद तर निम्न दुधनातुन विसर्ग सुरू

पोलीस सुञांनी दिलेल्या माहितीनुसार येथील फुलेनगरातील रहिवासी शेतकरी परसराम नारायण कावळे (वय ३५) यांनी दत्तक असलेल्या स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखेत पीक कर्ज मिळावे यासाठी सर्व कागदपत्राची पुर्तता केली. पीक कर्ज मंजूर करावे यासाठी ते अनेक महिन्यापासून बॅकेत खेट्या मारत होते. अखेर बॅकेने एक लाख ४२ हजार रुपये ऐवजी बॅकेने ९६ हजार रूपये कर्ज मंजूर केले. त्यामुळे हवालदिल झालेल्या कावळे यांनी शुक्रवारी दुपारी बॅकेत जाऊन बॅक मॅनेजर यांच्याशी वाद घालून रागाच्या भरात खिशातील किटकनाशक प्रशासन केले. सदरील शेतकर्‍यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच

माञ प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी उशीरापर्यंत सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी बॅक व्यवस्थापक अर्जुन पाटील यांच्या फिर्यादीवरून शेतकरी परसराम कावळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top