Crime News : लोखंडी रॉड गरम करून अंगाला चटके देऊन शेतकऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न; भोकरदन तालुक्यातील प्रकार
Farmer Attack : भोकरदन तालुक्यात जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉड तापवून चटके देण्याचा प्रयत्न झाला. हा अमानुष प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पारध : एकीकडे राज्यात मस्साजोग प्रकरण गाजत असतांना दुसरी घटना भोकरदन तालुक्यातील अन्वा (ता. भोकरदन ) गावात घडली. असून, जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉड चुलीत तापवून अंगाला अनेक ठिकाणी चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.