नापिकी, पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बीडची घटना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

एका शेतकऱ्याने नापिकी व पत्नीच्या आजारास कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भगवान साधू गवळी (वय ६३) असे मृताचे नाव आहे.

केज (जि. बीड) - केज शिवारातील मोळपट्टी म्हणून ओळख असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला एका शेतकऱ्याने नापिकी व पत्नीच्या आजारास कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) घडली आहे. भगवान साधू गवळी (वय ६३) असे मृताचे नाव आहे.

गवळी यांनी आजारी पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडून हातउसने पैसे घेतलेले होते. याशिवाय शेतात नापिकी होती. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी केज शिवारातील शेतात चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याचा मुलगा गणेश भगवान गवळी याने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून केज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक मंगेश भोले तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide due to wife's illness

Tags
टॉपिकस
Topic Tags: