सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

 मरडसगाव (ता.पाथरी,जि.परभणी) येथील शेतकरी विष्णू उद्धव शिंदे (वय ४०) यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (ता.२६) रात्री उशिरा उघडकीस आली.

पाथरी (जि.परभणी) : शेतात पेरणी पेरलेले सोयाबीन ७५ टक्के उगवले नसल्याने आणि  दुबार पेरणीसाठी पैसेही नाहीत. त्या मुळे दुबार पेरणी कशी? करायची या विवंचनेत असलेल्या मरडसगाव (ता.पाथरी) येथील शेतकरी विष्णू उद्धव शिंदे (वय ४०) यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (ता.२६) रात्री उशिरा उघडकीस आली.
 मरडस गाव (ता.पाथरी) येथील शेतकरी विष्णू उद्धव शिंदे (वय ४०) यांनी आपल्या तीन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. अल्पभूधारक शेतकरी असल्याने शेतात पेरणीसाठी दुसऱ्याचे बैल आणून पेरणी करावी लागली. पेरलेले सोयाबीन २५ टक्के ही उगवले नाही. दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाने पेरलेल्या सोयाबीनचा पंचनामा ही केला होता.  मात्र, दुबार पेरणी कशी करावी? या विवंचनेत हा शेतकरी होता. 

हेही वाचा : धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४९ वर

 लिंबाच्या झाडाला गळफास
शुक्रवारी (ता.२६) दुपारी शेतात गेल्या नंतर रात्री उशिरापर्यंत घरी पोहचले नसल्याने आणि त्यांच्या मोबाईलवर रिंग जाऊन ही फोन उचलत नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बाजूच्या आखाड्यावर फोन करून माहिती घेतली. रात्री १० च्या सुमारास त्यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकत असल्याचे दिसून आले. त्या नंतर शनिवारी (ता.२७) सकाळी त्यांचे भाऊ दत्ता उद्धव शिंदे यांनी पाथरी पोलिस ठाण्यात या बाबत माहिती दिली. त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पाथरगव्हाण बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.

हेही वाचा 
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताडकळस (जि.परभणी) : खांबेगाव (ता. पूर्णा) येथील श्यामराव कोंडीबा खंदारे (वय ३५) यांनी दारूच्या नशेत शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान स्वतः च्या राहत्या घरात झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : खते, बियाणांचे ३३० नमुने प्रयोगशाळेकडे, अहवालाची प्रतिक्षा...

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरिक्षक शिवदास लहाणे, पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरा ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन शनिवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना आळणे, होमगार्ड सिध्दार्थ डहाळे यांनी शवविच्छेदन केले. खांबेगाव येथील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात आंनद कोडींबा खंदारे यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide by strangulation Parbhani News