esakal | फेसबुकवर पोस्ट टाकून शेतकऱ्याची आत्महत्या, गेवराई तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide

फेसबुकवर पोस्ट टाकत शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. शेतकऱ्याकडे राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व कर्ज फेडणे मुश्कील झाले होते.

फेसबुकवर पोस्ट टाकून शेतकऱ्याची आत्महत्या, गेवराई तालुक्यातील घटना

sakal_logo
By
वैजिनाथ जाधव


गेवराई (जि.बीड) : फेसबुकवर पोस्ट टाकत शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. शेतकऱ्याकडे राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व कर्ज फेडणे मुश्कील झाले होते. तसेच नैराश्य निर्माण झाल्याने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची घटना सोमवारी (ता.२४) पहाटे सहा वाजता उघड झाली.

काशीनाथ त्रिंबक आरेकर (वय ३८, रा.आगारनांदूर, ता.गेवराई) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने सोमवारी पहाटे सहा वाजता फेसबुकवर मी काशिनाथ त्रिंबक आरेकर नातेवाईकांना व मित्रमंडळींना शेवटचं अशी पोस्ट टाकत घरापासून जवळच असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काशीनाथ आरेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व आई असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना

हनी ट्रॅप प्रकरणातील पोलिस कैलास गुजर बडतर्फ
विटभट्टी चालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीत सहभाग असलेला पोलिस नाईक कैलास गुजर यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी (ता.२३) ही कारवाई केली. केज तालुक्यातील एक विटभट्टी चालकाशी आष्टी तालुक्यातील एका महिलेने बांधकामासाठी विटा हव्या आहे, म्हणून संपर्क केला.

त्याला मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. नंतर, वाहन नसल्याचा कांगावा करत त्याला अगोदर पाटोदा व नंतर आष्टी येथे वाहनातून सोडण्याची विनंती केली. चहा पिण्याच्या बहान्याने त्याच्याशी लगट करुन याचे व्हिडीओ चित्रण केले. सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती दहा लाख रुपये देण्याचे ठरले. परंतु, विटभट्टी चालकाने या प्रकरणी नेकनूर येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन यामध्ये कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील कैलास गुजर हा आष्टी पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत होता. तपासात या प्रकरणात कैलास गुजरचा सहभाग आढळला. गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या कैलास गुजर यास सुरवातीला निलंबित करण्यात आले होते. नंतर आता त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
 

(संपादन - गणेश पिटेकर)