esakal | बामणी मंडळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सोमवारी कुऱ्हाडी येथे एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

A farmer committed suicide at Kurhadi under Bamani police station in Jintur taluka

सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी तथापि भारतीय नवीन वर्षाच्या प्रारंभालाच हरिभाऊ लक्ष्मण बोराडे या जेष्ठ शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपवली आहे.

बामणी मंडळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सोमवारी कुऱ्हाडी येथे एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कुऱ्हाडी येथे एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने नववर्षाच्या प्रारंभालाच सोमवारी (ता.१६) गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिभाऊ लक्ष्मण बोराडे (६५ वर्षे) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी घटनेची नोंद केली आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी दहेगाव येथील चोवीस वर्षे वयाच्या गणेश ढोणे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याचदिवशी वझर येथील साहेबराव वटाणे ( वय५५ वर्षे) यांनीही मरणाला कवटाळले आणि सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी तथापि भारतीय नवीन वर्षाच्या प्रारंभालाच हरिभाऊ लक्ष्मण बोराडे या जेष्ठ शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपवली आहे. सदरची घटना सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत बामणी पोलीस बिट जमादार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अकस्मात मृत्यू अशी घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
 
यावर्षीचा ऑगस्ट-सप्टेंबर मधील सततचा पाऊस, मागील महिन्यात झालेली अतिवृष्टी यामुळे हाती आलेली, येऊ घातलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलेच आर्थिक कोंडीत सापडल्याने डोक्यावरच्या कर्जाचे ओझे फेडण्यासाठी पर्याय नाही. तसेच रब्बी हंगामातील बी-भरण, खतपाणी शिवाय प्रपंचाचा गाडा, मुलांचे शिक्षण, लेकीबाळीचे कर्तव्य इत्यादी प्रश्नांची सोडवणूक कशी करायची, अगोदरचे देणे बाकी असल्याने कोणी उधार उसणवारी करण्यासाठी धजेना, शासनाची मदतही वेळेवर मिळेना. त्यामुळे चिंताग्रस्त बनलेले तालुक्यातील शेतकरी मरणाला जवळ करत आहेत. या तीनही आत्महत्यांच्या घटनामागील हिच प्रमुख कारणे असल्याचे दिसत आहे.
 
शासन व प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये, म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील तमाम शेतकरी करत आहेत.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top