उदगीर तालुक्यात शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

Farmer Suicide News, Udgir
Farmer Suicide News, Udgir

हेर (जि.लातूर) ः उदगीर तालुक्यातील हेर येथे मंगळवारी (ता.२१) दुपारी शेतकऱ्याने बँकेचे कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून करवंदीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे दत्तात्रय रामराव वजीरे (वय ५६ ) असे आहे. येथे त्यांची तीन एकर शेती आहे. त्यांच्यावर दोन बँकेचे दोन लाख रुपये कर्ज होते. तसेच गेल्या दोन-तिन वर्षांपासून कुटुंबातील व्यक्तींना दवाखान्यात मोठा खर्च झाला होता.

नियमित मासिक दवाखान्याचा उपचार व इतर खर्च चालविणे, मुलाच्या शिक्षणाचा खर्च हे सर्व शेतीवरच अवलंबून असल्याने हा सर्व खर्च आवाक्याच्या बाहेर गेला होता. त्यातच सततच्या नापिकीने कर्ज फेडणे व सर्व खर्च भागविणे अवघड होऊन गेल्याने निराश होऊन आत्महत्येला कवटाळले असल्याचे त्यांचा भावाचा मुलगा अरूण वजीरे यांनी सांगितले.


त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश गायके, विकास लोखंडे, चंद्रकांत राचमाळे, करडखेल बीटचे जमादार डी.बी.शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सरपंच सतीश घोगरे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, पोलिस पाटील एकनाथ कसबे, माजी सरपंच पंडित ढगे, मंडळ अधिकारी पंडित जाधव आदी उपस्थित होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक एस.पी.सिरसाठ यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हेडकॉन्स्टेबल डी.बी. शिंदे हे करीत आहेत.

हैदराबादहून आलेल्यांवर गुन्हा
औराद शहाजानी (जि.लातूर) ः औराद शहाजानी (ता.निलंगा) येथील पोलिस ठाण्यात हैदराबाद येथून आलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे औराद शहाजानी व परिसरात कोरोना रोगाचा प्रतिबंध व्हावा यासाठी लागू असलेली टाळेबंदीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्यासाठी पोलिस कारवाई करीत आहेत. औरादसह परिसरात संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या ३५ गावांमध्ये अँटी कोरोना फोर्सची स्थापन करण्यात आली आहे व त्याची प्रकरणे अंमलबजावणी केली जात आहे. यासंबंधी औराद शहाजनी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गोड, श्रीनिवास जगताप हे पुढील तपास करीत आहेत.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com