Beed : शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Beed : शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा

डोंगरकिन्ही : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. यासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले. दोन वेळा सत्तांतर झाले. नंतर २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदही करण्यात आली. बँकांकडून अनेक वेळा माहिती मागविण्यात आली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात छदामही पडला नाही.

डोंगरकिन्ही येथील शेतकऱ्यांना जिल्हा बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पतपुरवठा करण्यात येतो. गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना ग्रामीण बँकेनेच पतपुरवठा केला आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनीही परतफेड वेळेवर केली आहे. प्रसंगी आपल्या घरातील मंगल कार्य पुढे ढकलून, मुकादमाकडून उचल घेऊन, नातेवाईकांकडून उसनवार घेऊन परिसरातील शेतकरी शेती कर्जाचे नूतनीकरण करत असतात. विशेष म्हणजे ग्रामीण बँकेच्या येथील शाखेचा शेतकरी कर्ज फेडीत सातत्याने जिल्ह्यात पहिला क्रमांकावर आहे. मात्र अनेक वेळा अनुदान खात्यावर जमा करण्याची तारीख देऊनही जमा न झाल्याने शेतकरी निराश आहेत.

दरम्यान, साखर कारखाने १ ऑक्टोबरला सुरू करण्याबाबत शासननिर्णय झाला आहे. त्यामुळे बेलापूर (ऊसतोड कामगार कारखान्याकडे) जाण्यापूर्वी अनुदान खात्यावर जमा व्हावे, जेणेकरून दसरा- दिवाळी गोड होईल, रब्बी हंगामासाठी शेतात खर्च करता येईल. अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Web Title: Farmer Debt Relief Scheme 2019 Awaiting Grant Factory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..