गेवराई तालुक्यात हायवा ट्रकने शेतकऱ्याला चिरडले, गावकऱ्यांनी सुरु केले ठिय्या आंदोलन 

वैजीनाथ जाधव
Monday, 4 January 2021

गेवराई तालुक्यात सोमवारी (ता.चार) सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर वाळूच्या हायवा ट्रकने शेतकरी रुस्तुम मते यांना चिरडले.

गेवराई (जि.बीड) : गेवराई तालुक्यात सोमवारी (ता.चार) सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर वाळूच्या हायवा ट्रकने शेतकरी रुस्तुम मते यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले असल्याची घटना सोमवारी (ता.चार) रोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान  घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गावकर्‍यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 

औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...

 

गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय ६०)  हे सकाळी साडेसहाच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षसभुवन येथून अवैधरित्या  वाळू घेऊन  जाणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले.  या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तात्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा. यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन  सुरु केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

दागिने चोरीप्रकरणी सहा दरोडेखोर अटकेत, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

महसूलच्या हप्तेखोरीमुळे सर्वसामान्यांचे जीव गेले
महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हाप्तेखोरी मुळे वाळूमाफिया राजरोसपणे नदी पात्रातून वाळू उपसा करत आहेत. मात्र महसूल प्रशासन हप्तेखोरीमुळे डोळेझाक करत असल्याने  वाळूमाफिया वाळू भरल्यानंतर सुसाट वेगाने वाहने चालवत असल्यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक  जणांचे या अपघातामुळे जीव गेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून गेवराई तालुक्यातील अवैधरित्या होणारा वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.

 

तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदारांची निलंबनाची मागणी
जिल्हाधिकारी यांनी मनसेच्या मागणीची दखल घेतली असती तर त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले असते. गेल्या आठवडा भरापूर्वी राक्षसभूवन , सावळेश्वर , गंगावाडी  या ठिकाणावरून अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधीकारी यांना केली होती. परंतु पोलीस, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी , यांच्या मालकीच्या वाळू हायवा ट्रक आहेत. हायवा या शेतकरी यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकणी स्थानिक तलाठी व मंडळ अधीकारी,  तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना तात्काळ निलंबीत करा अशी मागणी मनसेचे जिल्हाधक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आहे .

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Died In Truck Accident Gevrai Block Beed News