Wild Boar Attack : रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
Beed News : दुपारी शेतात जाताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या देपेगाव येथील शेतकरी श्रीकिसन काळे यांचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले आणि नातवंडांचा परिवार आहे.
माजलगाव : शेतात जात असताना अचानकपणे रानडुकराने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी श्रीकिसन काळे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.