esakal | कानोसा येथील तरुण शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली

कानोसा येथील तरुण शेतकरी अजय शेतात गेला असताना बांधाऱ्यात त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेला

कानोसा येथील तरुण शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू

sakal_logo
By
मारोती काळे

कुरुंदा (हिंगोली): वसमत तालुक्यातील कानोसा येथील तरुण शेतकऱ्याचा (अजय वसंतराव मस्के) पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. सात) अंदाजे दोनच्या सुमारास हा शेतकरी शेतातून परत गावाकडे येत असताना शेतालगत असलेल्या बांधा-यात पाय घसरुन नदीत पडला. पुराच्या पाण्यात वाहून गेला रात्री उशीरा त्याचा मृतदेह सापडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानोसा येथील तरुण शेतकरी अजय शेतात गेला असताना बांधाऱ्यात त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेला.

घटनास्थळी पोलिस स्टेशचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल गोपिनवार, बिट जमादार वाळके आपल्या पथकासह दाखल झाले. लगेच सदरील तरुणाचा नदी शेजारी पोलिसांसह नातलग मित्रांनी शोध घेतला. त्यानंतर अजय मस्के या तरुणाचा रात्री ११ च्या सुमारास बागल पार्डी शिवारातील ओढ्यात मृत अवस्थेत सापडला.

हेही वाचा: लोअर दूधनाचे सोळा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

याबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुधवार ता. आठ प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा येथे आणण्यात आला होता. कानोसा येथील स्मशानभुमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजयच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

loading image
go to top