esakal | पूर्णा नदीपात्रात शेतकऱ्याचा मृत्यू : जिंतूर तालुक्यातील दुर्घटना

बोलून बातमी शोधा

file photo}

घडोळी शिवारातून वाहणाऱ्या नदी पात्रातही त्यांनी शोध घेतला. मात्र श्री. जाधव यांचा शोध लागला नाही. परत सोमवारी (ता. आठ) नदीपात्रातील पाणी कमी केले व पुन्हा गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरु केली

पूर्णा नदीपात्रात शेतकऱ्याचा मृत्यू : जिंतूर तालुक्यातील दुर्घटना
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील घडोळी येथील नामदेव मंगू जाधव ( वय ४५) या शेतकऱ्याचा पुर्णा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. सात) घडली. सोमवारी (ता. आठ) उशिरा ग्रामस्थांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

जिंतूर तालुक्यातील घडोळी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन शेतकरी नामदेव जाधव हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या शेतातील विद्युतपंप सुरु करण्यासाठी गेले होते. ते उशिरापर्यंत परत आले नाही. नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी शोधाशोध करुनही त्यांचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी जिंतूर पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. बिट हवालदार ए. एस. कांदे, श्री. बोधनकर यांनी शोध सुरु केला. 

घडोळी शिवारातून वाहणाऱ्या नदी पात्रातही त्यांनी शोध घेतला. मात्र श्री. जाधव यांचा शोध लागला नाही. परत सोमवारी (ता. आठ) नदीपात्रातील पाणी कमी केले व पुन्हा गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरु केली असता दहाच्या सुमारास श्री. जाधव यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनास्थळी पोलिस व महसूल प्रशासन, तालुका आरोग्य विभागाचे पथक आणि घडोळी, खोलगडगा येथील सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थ आदींनी धाव घेतली. पोलिसांनी पाण्यातील मृतदेह बाहेर काढला. पंचनामानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बोरळकर, डाॅ.स्वाती अकोशे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधईन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे