विद्यूत डीपीचे काम करत असताना अचानक लाईट आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

राजेंद्र मस्के हे गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील डीपीवरील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने डीपीवर काम करण्यासाठी चढले होते
electricity
electricityelectricity
Updated on

बेलकुंड (जि.लातूर) : विद्युत डीपीवर काम करीत असताना अचानक सुरू झालेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्यामुळे चिंचोली काजळे (ता. औसा) येथील सरपंच रमाबाई मस्के यांचे पती राजेंद्र मस्के यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.दहा) सायंकाळी घडली (farmer die due to electricity current). त्यांच्यावर आज मंगळवारी (ता.11) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राजेंद्र मस्के हे गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील डीपीवरील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने डीपीवर काम करण्यासाठी चढले होते. मात्र अचानक वीज प्रवाह सुरू झाला त्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसल्याने ते डीपीवरून खाली पडले. त्यांना पुढील उपचारासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले असता तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

electricity
चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

राजेंद्र मस्के यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी सरपंच रमाबाई मस्के, दोन मुले, एक मुलगी सुन असा परिवार आहे. राजेंद्र मस्के हे गावातील कसल्याही सामाजिक कामाला धावून येत असे त्यामुळे त्यांच्या जाण्याने गावात दु :खाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.
Marathi News Esakal
www.esakal.com