
लातूर : कातपूर (ता. लातूर) येथील एका विहिरीतील सबमर्सिबल पंप काढण्यासाठी पाण्यात गेलेल्या शेतगड्याचा बुडून मृत्यू झाला. तब्बल वीस तासांनंतर त्याचा मृतदेह काढण्यात यश आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केल्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.