Electric Shock Farmer Death : वीजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू; केज येथील जिवाचीवाडी येथील घटना
Farmer Dies of Electric Shock : जिवाचीवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीराम चौरे यांना घरातील पाण्याची मोटार सुरू करताना वीजेचा जोराचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घर ओले असल्याने हा अपघात घडला.
केज : घरातील पाण्याची विद्युत मोटार सुरू करताना वीजेचा धक्का लागून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जिवाचीवाडी येथे घडली.