पाचोड - सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून जीवन संपविल्याची दुर्देवी घटना आंतरवाली खांडी (ता. पैठण) येथे गुरुवारी (ता. १७) पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून लहू भीमराव डिघुळे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.