Onion Farmer : साठवणूक केली तर सडतोय, विकावा तर भाव पडतोय; कांदा उत्पादकांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहिर’

Onion farmers in trouble
Onion farmers in trouble sakal
Updated on

जातेगावः आजच्या परिस्थितीत बाजारात टोमॅटोला अधिक भाव मिळत असल्याने काही शेतकरी समाधानी आहेत. पण त्याचबरोबर कांद्याचे दर गडगडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भाव वाढेल या अपेक्षेने विक्री न केलेला कांदा सडू लागल्याने उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Onion farmers in trouble
Chh. Sambhajinagar : नवीन राजकीय समीकरणे MIMच्या पथ्यावर; मतांच्या फाटाफुटीत लागू शकते लॉटरी

जातेगाव परिसरातील सेलू, चोपड्याचीवाडी, टाकळगव्हाण, ठाकर आडगाव, रोहितळ, काठोडा, गोळेगाव, मनुबाई जवळा, रामपुरी आदी गावांतील बहुतांश शेतकऱ्यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ऊसात कांदा लागवड केली. तर काहींनी एकर- दोन एकर क्षेत्रात फक्त कांद्याचे पीक घेतले.

पण सध्या शेतकऱ्यांचा कांदा विक्रीस बाजारात येताच दर गडगडल्याने प्रतिकिलो किमान ३ दर मिळत असल्याने केलेला खर्च पदरात पडणे मुश्किल होऊन बसले आहे. जातेगाव परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कांदा सडत असल्याने ते संकटात सापडले आहेत.

Onion farmers in trouble
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्री?

टोमॅटोने ओलांडली शंभरी

मागील आठवड्यात साधारण प्रति किलो शंभर रुपयांच्या आत असलेल्या टोमॅटोचे दर या आठवड्यात प्रति किलो १२० रुपयांच्या घरात पोहचले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असली तरी उत्पादक शेतकरी यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू येत आहेत. दुसरीकडे मात्र कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने डोळ्यात पाणी आणले आहे.

एक एकर कांदा केला असता तो विक्रीस योग्य होताच भाव कमी झाले. साधारण दहा ते पंधरा टन उत्पन्न मिळाले. यातील दहा टन विक्री केला असता चार ते पाच रुपये प्रती किलो दराने विकला. अजूनही भाववाढीच्या अपेक्षेने पाच टन कांदा ठेवलेला आहे. पण दर वधारत नसल्याने तो देखील सडू लागला आहे.

- नारायण सोळंके, शेतकरी, सेलू.

शेतकरी पिकवत असलेला कांदा शंभरीपर्यंत पोहोचत असल्याने यामुळे बहुतेक शेतकरी कांदा लागवड करण्याकडे वळला. यंदा मात्र कांद्याचे दर गडगडल्याने खर्च देखील पदरात पडला नाही.

- राधेश्याम लेंडाळ, शेतकरी, जातेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.