Hingoli News: हिंगोलीच्या कलगाव शिवारात शेत राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचे लचके तोडले गेले.
हिंगोली : वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कलगाव (ता. हिंगोली) शिवारात निदर्शनास आली. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली. पोलिस व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.