Gavrai Crime : बीडमधील गेवराईतील शेतकऱ्याचे भरदिवसा घर फोडले, नऊ लाखांचा ऐवज लंपास
Police Investigation : गेवराईतील एका शेतकऱ्याचे घर शेतात काम करण्यासाठी बंद करुन असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या चोरीत चोरट्यांनी नऊ लाख रुपयांहून अधिक ऐवज लंपास केला.
गेवराई : घराला कुलूप बंद करुन शेतात काम करण्यास गेलेल्या गेवराईतील शेतक-याचे भरदिवसा घर फोडून आज्ञात चोरट्यांनी नऊ लाखाहून ऐवज लंपास केल्याची घटना काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.