Onion Market Rate : शेतकऱ्यांचा कांद्याने केला वांधा; बाजारात मिळेना भाव, व्यापाऱ्यांकडून होईना खरेदी

कांद्याला बाजारात भाव मिळत नाही, ग्राहक, व्यापारीही खरेदीला येत नसल्याने उत्पादक शेतकरी झाले त्रस्त.
Onion News
Onion Newsesakal

कुंभार पिंपळगाव - कांद्याला बाजारात भाव मिळत नाही, ग्राहक, व्यापारीही खरेदीला येत नसल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच सततच्या वातावरणातील बदलामुळे चाळीतील कांदा सडत आहेत. यंदाही कांद्याने शेतकऱ्यांचे वांधे केले आहेत.

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारे आणि चांगले पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. मात्र उन्हाळ्यात भाव मिळाला नाही, पावसाळ्यात तरी भाव वाढेल या आशेवर कांदा साठवून ठेवला, मात्र तसे झाले नाही. वातावरणात बदलामुळे कांदा सडत आहेत.

परिसरातील पिंपरखेड, अरगडे गव्हाण, राजाटाकळी, लिंबी, मूर्ती या भागात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. अनेक शेतकऱ्यांचा कांदा उन्हाळ्यात शेतातच उघड्यावर पडलेला होता. जांबसमर्थ भागात प्रत्येक शेतकऱ्यांनी चाळीची सुविधा नसल्यामुळे शेतातच लाकडे रोवून पत्र टाकून,प्लॅस्टिक टाकून कांदा चाळी तयार केल्या आहेत.

या चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे ढगाळ वातावरण आणि उष्णता यामुळे कांदे मोठ्या प्रमाणात सडले आहेत. दररोज सडलेले कांदे फेकून द्यावे लागतात. प्रतवारी करावी लागते. सध्या कांद्याला ठोक १० ते ११ रुपये किलोचा भाव आहे तर बाजारात दहा रुपयाला दीड किलो विकावे लागत आहेत. एकीकडे भाव नाही, दुसरीकडे गिऱ्हाईक नाही तर दररोज होणारे नुकसान यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

यावर्षी कांद्याला भाव नाही. उन्हाळ्यात काहींनी सात रुपये किलोने ठोक कांदा विकला. मध्यंतरी १४ रुपये किलोपर्यंत भाव गेले होते, ते घसरून आता दहा ते ११ रुपये झाले आहेत. ते परवडत नाहीत. चांगला भाव मिळेल म्हणून कांदा साठवून ठेवला आहे. मात्र सडत आहे. बियाणे, लागवड, खुरपणी, फवारणी, पात चिरणे, गोण्यात भरणे खर्चाला महाग झाले आहे. उत्पादन कमी आणि खर्च जास्त यामुळे कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे.

- मुस्तफा शेख, शेतकरी, जांबसमर्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com