कंधार तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.
Web Title: Farmer Suicide in Kandhar Tahsil