Latur Farmer : औताला जुंपलेल्या शेतकऱ्यास मिळणार मदत; हडोळती येथे अंबादास पवार यांच्या घरी पोचला कृषी विभाग
Latur News : हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी बैलजोडी नसल्यामुळे स्वतःला औताला जुंपून शेती केली. ही परिस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कृषी विभाग व सहकार संस्थांनी तातडीने मदत दिली.
हडोळती (जि. लातूर) : बिकट आर्थिक स्थितीमुळे बैलजोडी नसल्याने लातूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी चक्क स्वतःला औतास जुंपले होते. याबाबत सोशल मीडियावरून छायाचित्रे व्हायरल झाली.